Breking News

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०१५

कुशल मार्गदर्शक नेतृत्व: लक्ष्मणराव माळी

कुशल मार्गदर्शक नेतृत्व: लक्ष्मणराव माळी
शिक्षण महर्षी आप्पा साहेब लक्ष्मण बबनराव माळी ह्यांच्या वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील सर्वात जुनी शैक्षणिक संस्था पी.ई.सोसायटीचे ते गेल्या 15 वर्षापासुन अध्यक्ष आहेत. त्यांचा कार्यकाळात संस्थेने वैभव प्राप्त केले. आदिवासी भागात शाळा कॉल्लेजेसच्या माध्यमातून तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी विध्यार्थ्याना त्यानी शिक्षणाची द्वारे मुक्त केली. पी.ई.सोसायटीच्या शाळेत शिकुन असंख्य विद्यार्थी मोठ्या पदावर गेले आहेत. त्यांचे श्रेय आप्पासाहेबाना जाते. मागास भागातील संस्थांची अवस्था काय असते हे सर्वाना माहीत आहे. मात्र आप्पासाहेब लक्ष्मण माळी ह्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेला एक वेगळे स्वरुप प्राप्त करुण दिले. ह्यासंस्थेतून ज्ञानाची दिशा घेणारे विद्यार्थी तयार झाले पाहिजे असा त्यांचा संकल्प आहे. त्यामुळे संस्थेतील शिक्षक कर्मचारी वर्ग मोठ्या परिश्रमाने संस्थेच्या नाव लौकीकात भर घालत आहे. परिसरातील मुले शिकुन मोठे व्हावेत व आपल्या भागाचा विकास करावा हेच आप्पाचे धेय आहे. पिताश्री स्व.बबनराव माळी पेहलवान व आई विमलबाई माळी ह्यांच्या आशिर्वादाने आप्पासाहेबानी हे यश मिळवले आहे. लहान बंधु भरतभाई माळी व संजय माळी ह्यांची त्याना साथ मिळाल्याने आप्पासाहेबानी कधी मागे वळून पाहिले नाही. वडिलांच्या निधनानंतर सारे कुटुंबाला आप्पासाहेबानी आधार दिला. वटवृक्षा सारखी मायेची सावली दिली. शैक्षणिक संस्थेच्या व्यापात देखील आप्पा घरच्या शेतीत चांगलेच रमतात नवनविन प्रयोग राबवुन चांगले उत्पन्न घेतल्याने त्यांची प्रगतशील शेतकरी म्हणुन ते प्रसिद्ध आहेत. आप्पासाहेबाना त्यांच्या पत्नी सौ.शारदाताई ह्यांची मोलाची साथ लाभली आहे. त्यांच्या सुन सौ योजनाताई भरत माळी ह्या तलोदा नागरपालिकेच्या नगराध्यक्षा आहेत. आप्पा साहेबांचे जीवन म्हणजे एक मार्गदर्शक दीपस्तंभासारखे आहे. अश्या मार्गदर्शक नेतृत्वास मनपूर्वक शुभेच्छा....                
                                                                सुधाकर मराठे ( उपशिक्षक )
                                                          न्यु इंग्लिश स्कुल व ज्यु कॉल्लेज अक्कलकुवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा